Ad will apear here
Next
शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार समारंभ
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या 'ड्रीम आयएएस सेंटर'तर्फे दोन सप्टेंबर रोजी 'डॉ. कलाम टीचर इन्स्पायर अॅवॉर्ड २०१७' देण्यात येणार आहे. खासदार बसवराज पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. शिवरत्न शेटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. महापौर शोभा बनशेट्टी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, सिध्दराम चाकोते, अशोक टांकसाळे हे मान्यवरदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामया कार्यक्रमात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. दिलीप कोने, सोलापूर विद्यापीठाचे संगणक विभाग प्रमुख प्रा. राजकुमार मेंथे, येळेगांव येथील शिक्षक पंडित साबा, बबलाद येथील शिक्षक शरणप्पा फुलारी, मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कवठगीमठ, केशव आबाजी इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका संगीता सरदेशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उस्मानाबाद येथील नंदकिशोर पिंपळे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : २ सप्टेंबर २०१७
वेळ : सकाळी ११ ते २
स्थळ : डॉ. निर्मलकुमार फडकुले हॉल, सोलापूर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZZOBG
Similar Posts
पर्यावरणदिनानिमित्त सायकल रॅली सोलापूर :   ड्रीम फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने पर्यावरण जागर सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश त्यातून देण्यात आला. यशवंतराव चव्हाण पुतळा ते स्मृती उद्यान या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या
‘स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी महत्वाची’ सोलापूर :   विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ‘ड्रीम फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले रविराज कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. ‘ड्रीम आयएएस सेंटर’ येथे दोन जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र रविराज यांनी दिला
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सोलापुरात विशेष हेल्पलाइन सोलापूर : ‘यंदा एकही मुलगा शैक्षणिक नैराश्याला बळी पडणार नाही. नापास होणे हा काही गुन्हा नाही मुलांनो! चला, नव्या जोमाने यशाकडे झेप घेऊ या! आम्ही आपल्यासोबत आहोत. आई-बाबासुद्धा आपल्यासोबत आहेत बरं का...फक्त संवाद होऊ द्या.....’ अशी साद घातली आहे सोलापूरमधील दोन संस्थांनी. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language